जय गुरुदेव
गु अर्थात अंधकार , रु अर्थात काढून टाकणारा. आपल्या आयुष्यातून जो अंधःकाराला काढून टाकतो त्याला गुरु म्हणतात. मला गर्व मी अशा गुरूंची शिष्या आहे जे स्वतः ईशवरप्राप्त आहेत आणि ज्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोकांच्या आणि धर्माच्या सेवेत बहाल केले. माझ्या गुरुची अशी इच्छा आहे कि त्यांच्या शिष्यानी सुद्धा ईश्वरप्राप्ती करावी. आमच्या हातून आमच्या बापूजींची हि इच्छा पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
गुरु कृपास्य केवलम, शिशस्य परम मंगलम.
शिष्याचं परम मंगल होण्यासाठी गुरूंची कृपाच पर्याप्त आहे .
आपली परंपरा
शास्त्रांमध्ये गुरु म्हणजे ब्रम्हा , विष्णू आणि महेश आहेत असे म्हटले जाते . गुरूची महिमा अवर्णनीय आहे असे संत ज्ञानेश्वर म्हणतात . गुरु शिष्य परंपरा हि अनेक युगापासून आपल्या भारतात आहे . भौतिक जगात राहणारा माणूस गुरूच महत्व जाणत नाही . माणसाला हे जाणंण आवश्यक आहे कि हा संसार कुणाचा नाही . सगळ्यांना हे जग सोडून जावं लागत . पण माणसाला या मोह मायेत कळतच नाही कि अशी कुठली गोष्ट आहे जे तो घेऊन जाऊ शकतो . या जगात फक्त देवाचे नाव आहे जे संगती जाऊ शकते. त्यातच आपल्या संपूर्ण जीवनाची संचित पुंजी आहे. आणि हे जर गुरुदेवांकडून भेटेल तर ते विशेष लाभदायी आहे . सर्व पूर्व जन्माच्या पापांना नष्ट करण्याची ता कत या भगवंताच्या नामात आहे . माझे गुरुदेव " परम पूज्य संत श्री आसारामजी बापू " पूर्ण ब्रह्मनिष्ठ संत आहेत. कारण ते माझ्या आयुष्यात आल्यापासून मला कृष्णाचं महत्व कळलं . मीडिया वाले कितीही गळे फाडून ओरडू दे मला माझ्या गुरुवर पूर्ण विश्वास आहे आणि सदैव राहिलं.
सर्व हरे कृष्ण , राधे राधे , हरी ओम

0 comments:
Post a Comment